Home अहमदनगर जिल्हा महिला अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात, पोलीस कोठडीत रवानगी

जिल्हा महिला अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात, पोलीस कोठडीत रवानगी

Ahmednagar District Women Officer Bribery Department Trap

अहमदनगर | Ahmednagar: जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रजनी रामदास खुणे यांना तब्बल ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना गुरुवारी रंगेहाथ पकडले. त्यांना न्यायालयाने दोन  पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

संगमनेरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायकाच्या आजारपणाच्या कालावधीतील वेतनाची रक्कम दिली म्हणून त्याबदल्यात ६० टक्के रक्कम ८४ हजार रुपये लाचेची मागणी करत ८० हजार रुपये खुणे यांनी स्वीकारली. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले व त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी कामकाज पाहिले. खुणे यांनी मोठी लाच स्वीकारली आहे. यामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का? याचा तपास करावयाचा आहे. हा गुन्हा गंभीर आहे. त्यांची पुणे परिसरातील वाकड येथे बंगला असून तेथे तपासणी करावयाची आहे. इतर बाबींचीही माहिती द्यायची असल्याने खुणे यांना चार दिवसांची कोठडीची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.  

Web Title: Ahmednagar District Women Officer Bribery Department Trap

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here