Home राहाता  जिल्ह्यात चोरीचे सत्र सुरूच: घरातून १० तोळे दागिन्यांची चोरी

 जिल्ह्यात चोरीचे सत्र सुरूच: घरातून १० तोळे दागिन्यांची चोरी

Rahata Theft of 10 weights of jewelery from the house

राहता | Rahata: राहता तालुक्यातील लोणी हद्दीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. कोल्हार येथे भरगच्च वस्तीत असलेल्या बंद घराचा दरवाजा तोडून चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबबत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ही चीरीची घटना गुरुवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये सुमारे ५ लाख किमतीचे १० तोळे सोने चांदी व २५ हजार रोख रक्कम असा ऐवज अज्ञात पाच चोरट्यांनी चोरी केला आहे, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

याबाबत बनवारी ओमप्रकाश जागीर यांनी लोणी पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी की, निवृत्त आर्मी अधिकारी रवींद्र दांडगे यांच्या भाडेकरूंच्या घरात सदर घटना घडली आहे. नगर मनमाड रस्त्यालगत पतीलबा नगरमध्ये रवींद्र दांडगे यांच्या घरी भाडोत्री म्हणून वास्तव्यास असलेल्या  बनवारी ओमप्रकाश जागीर कडे चोरी झाली. बंगल्याचे तारेचे कंपाऊंड तोडून चोरट्यांनी आवारात प्रवेश केला. २५ तारखेस हे भाडेकरू हे बाहेर गेले असताना घराचे कुलूप व कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. विशेष बाब म्हणजे या घराजवळ दाट लोकवस्ती आहे. घरातील हॉलमध्ये असलेल्या पिशवीतून ऐवज चोरी गेला.

Web Title: Rahata Theft of 10 weights of jewelery from the house

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here