Home महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या या आमदाराचे निधन

राज्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या या आमदाराचे निधन

MLA Bharat Bhalke passes away

पंढरपूर: मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन झाले आहे. करोनातून बरे होऊन त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना रात्री १२:३० च्या सुमारास त्यांचे निधन झाले.

त्यांचे वय ६० वर्ष होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, पुत्र आणि तीन विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे. ऑक्टोबरमध्ये त्यांना करोनाची लागण झाली होती. ते काही दिवसानंतर बरे होऊन घरी परतले होते.

मात्र मागील आठवड्यात पुन्हा प्रकृती बिघडल्याने गुरुवारी रात्रीपासून त्यांची प्रकृती खालावत गेली. करोनामुळे त्यांच्या अवयवांवर परिणाम झाला होता. शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्यांना भेटण्यासाठी काल रुग्णालयात गेले होते.

Web Title: MLA Bharat Bhalke passes away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here