Home अहमदनगर नगर दौंड रस्त्याचे काम करणाऱ्या प्रोजेक्ट मॅनेजर कडे पन्नास हजारांची खंडणी मागणी...

नगर दौंड रस्त्याचे काम करणाऱ्या प्रोजेक्ट मॅनेजर कडे पन्नास हजारांची खंडणी मागणी व मारहाण

नगर दौंड रस्त्याचे काम करणाऱ्या प्रोजेक्ट मॅनेजर कडे पन्नास हजारांची खंडणी मागणी व मारहाण

नगर – दौंड रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या दिनेशचंद्र आर. अग्रवाल या कंपनीचे व्यवस्थापक मनोहर यादव यांना श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलु नजीक मोटार सायकलवर आलेल्या तिघांनी शिवीगाळ दमदाटी करत ५० हजारांची खंडणी मागितली मात्र खंडणी देण्य्यास नकार दिल्यामुळे या अधिकार्याला लाथा बुक्यांनी मारहाण केली. हा प्रकार रविवार दिनांक १५ रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला.

You Might Also Like: Shraddha Kapoor Upcoming Movies With Release Date

याबाबत व्यवस्थापक मनोहर यादव यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात तिघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.  फिर्यादीत त्यांनी नमूद केले आहे कि , रविवारी दि. १५ रोजी सायंकाळी ४:३० च्या सुमारास काष्टीकडून दौंडकडे जाणार्या रस्त्यावर एका पुलाचे काम सुरु आहे. त्या ठिकाणी बजाज सी.डी. डीलक्स कंपनीच्या मोटारसायकल क्र. एम.एच. १२ पी.पी.८५९४ या दुचाकीवर तिघेजण आले. त्यांच्या गळ्यात जाड सोन्याच्या चैनी होत्या.त्यांनी येथील मुख्य ठेकेदार कोण आहे. त्यास त्यास आम्हाला भेटायचे आहे अशी विचारणा केली. त्यावेळी मनोज यादव यांनी मीच येथील ठेकेदार असल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी या भागातील आम्ही दादा लोक आहोत. तुला जर रस्त्याचे काम करावयाचे असेल तर आम्हाला दरमहा 50 हजार रुपयांचा हप्ता द्यावा लागेल. त्यावर यादव म्हणाले मी साधा मॅनेजर आहे. मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. असे म्हणताच त्यांनी यादव यांच्या कानशिलात लगावली आणि लाथा बुक्यांनी मारहाण करून जर पैसे दिले नाही तर  आम्ही तुला काम करू देणार नाही आणि तुला जागीच ठार मारण्याची धमकी दिली.

You Might Also Like: Rajinikanth and Akshay Kumar’s 2.0

त्यावेळी सोबत असलेल्या अजित कुमार आणि विजय किशोर सिंह यांनी त्याची समजूत काढत भांडणे सोडवली. त्याच्यानंतर यादव यांनी वरिष्ठ सहकार्यासोबत येऊन श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.  


आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


HP DESKTOP
Hurry ! Discount Offer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here