Home अहमदनगर नगर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या जिल्हा बँकेच्या लेखापरीक्षण विभागाला आग

नगर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या जिल्हा बँकेच्या लेखापरीक्षण विभागाला आग

Ahmednagar fire engulfed the audit department of the district bank 

अहमदनगर | Ahmednagar:  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या लेखापरीक्षण विभागाला  शुक्रवारी सायंकाळी सात वाजता आग (Fire) लागली. आग लागल्याची माहिती मिळताच महानगरपालिकेसह एमआयडीसीचे अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान ही आग कशामुळे लागली यांची माहिती रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाही.

नगर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या तिसऱ्या मजल्यावर लेखापरीक्षण विभाग आहे. याच लेखापरीक्षण विभागाला शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमाराला आग लागली. कर्मचाऱ्यांनी याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली. मनपाच्या अग्निशमन दल तात्काळ दाखल झाले. त्यानंतर एमआयडीसीचे अग्निशमन दलही दाखल झाले. सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीमध्ये बँकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून लेखापरीक्षण विभागात सर्व वस्तू जळून खाक झालेल्या आहेत. नगर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे, तसेच कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक हे घटनास्थळी दाखल झाले.

Web Title: Ahmednagar fire engulfed the audit department of the district bank 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here