Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनामुक्त होणार हे पहिले गाव

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनामुक्त होणार हे पहिले गाव

Ahmednagar First vilage will be Corona free 

अहमदनगर | Ahmednagar: आदर्शगाव हिवरेबाजार १५ मे रोजी होणार कोरोनामुक्त. गेल्या दोन महिन्यात या गावात ५० जणांना कोरोनाची लागण झाली होती. लक्षणे असलेल्या नागरिकांना त्वरित कोरोना चाचणी करून बाधित रुग्णांना विलागीकारणात ठेवले होते, तसेच ग्रामस्थांनी नियमांचे पालन केल्याने हे गाव कोरोनामुक्त होत आहे.

पदमश्री पोपटराव पवार यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत धीर देत रुग्णांचे मनोबल वाढवले आहे. हिवरेबाजार गावात एप्रिल मे महिन्यात ५० जण बाधित झाले होते. यातील ३२ जण गावातील तर १८ रुग्ण हिवरेबाजार रहिवासी मात्र कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. यांमधील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. हिवरेबाजार प्रशिक्षण केंद्रावरील विलगीकरण कक्षात २५ रुग्णांना ठेवण्यात आले होते तर १८ रुग्ण घरीच अलागीकरणात होते. सध्या गावात केवळ एक रुग्ण सक्रीय असून नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.

१५ मे २०२१ पर्यंत हिवरेबाजार गाव कोरोनामुक्त करण्याचा संकल्प ग्रामपंचायत हिवरेबाजार व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र यांनी केला आहे.  

Web Title: Ahmednagar First vilage will be Corona free 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here