Home Suicide News जिल्ह्यातील खळबळजनक घटना: माजी महिला नगराध्यक्षांची घरात गळफास घेऊन आत्महत्या  

जिल्ह्यातील खळबळजनक घटना: माजी महिला नगराध्यक्षांची घरात गळफास घेऊन आत्महत्या  

Ahmednagar Former female mayor commits suicide by hanging at home

श्रीगोंदा | Ahmednagar Breaking Suicide Case : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहरात माजी महिला अध्यक्षांची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. श्रीगोंदा शहराचे अडीच वर्ष नगराध्यक्ष पद भूषविलेल्या श्यामला मनोज ताडे (वय वर्ष ४०) यांचा मृत्यू झाला आहे.

राहत्या घरामध्ये गळ्याभोवती साडी गुंडाळलेला फॅनला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना दिनांक २० डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याबाबत किरण दगडू ताडे (वय वर्ष ४३) यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला या घटनेबाबत माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्यामला ताडे या श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये अडीच वर्ष नगराध्यक्ष पदावर कार्यरत होत्या. अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षित जागेवर त्या निवडून आल्या होत्या. सदरील घटना धनश्री अपार्टमेंट श्रीगोंदा येथे त्यांच्या राहत्या घरात घडली आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेबाबत पोलीस कर्मचारी विकास वैराळ यांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Ahmednagar Former female mayor commits suicide by hanging at home

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here