Home अहमदनगर दरोडेखोरानी धुमाकूळ घालत महिलेसह दोघांना जबर मारहाण

दरोडेखोरानी धुमाकूळ घालत महिलेसह दोघांना जबर मारहाण

Theft robbers beat up the two, including the woman

श्रीरामपूर | Theft | Shrirampur:  श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील मुठेवाडगाव रोडवरील पिंपळेवस्तीवर दरोडेखोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला. यावेळी  घरातील व्यक्तींना वेठिस धरून जबर मारहाण केली. यावेळी दरोडेखोरांना प्रतिकार करताना देवीदास पिंपळे यांच्या एक महिला जखमी झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पिंपळे वस्तीवर काल पहाटे साडे चार ते पाच वाजेच्या दरम्यान दरोडेखोरांनी घराच्या मागील बाजुने आत प्रवेश केला. हा प्रकार लक्षात येताच देविदास पिंपळे यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दरोडेखोरांनी देविदास पिंपळे यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. घरातील एक महिलामध्ये पडली असता तिलाही मारहाण करण्यात आली. यावेळी श्री.पिंपळे यांच्या डोक्याला तसेच हाथा पायाला जबर मार लागला. त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने परिसरातील नागरिक मदतीला धावून आले. मारहाण करणार्‍या दरोडेखोरांनी तात्काळ या ठिकाणावरून पोबारा केला. दरोडेखोरांनी ऐवज चोरून नेला किंवा नाही हे मात्र समजू शकले नाही.

यावेळी नागरिकांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे याठिकाणी घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे.

Web Title: Theft robbers beat up the two, including the woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here