अहमदनगर: कमांडो युनिफोर्म परिधान करून करत होता डील, लाखो लुटले
अहमदनगर | Rahuri : सैन्य दलात नोकरी लावून देतो असे आमिष दाखवत युवकांची आठ लाखांची फसवणूक (fraud)करणाऱ्या तोतया कमांडोला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून युनिफोर्म, बनावट नियुक्तीपत्रे आदि साहित्य जप्त करण्यात आले आहे.
नवनाथ सावळेराम गुलदगड वय २४ रा. अग्रेवाडी ता. राहुरी असे अटक केलेल्या तोतया आरोपीचे नाव आहे. युवकाची फसवणूक केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी काळ्या रंगाच्या कमांडो, असे ठळक अक्षरात लिहिलेल्या स्कोर्पियो गाडीतून संगमनेर व राहुरी तालुक्यात फिरत होता. सैन्य दलात नोकरी लावून देण्याच्या बदल्यात युवकांकडे पैशाची मागणी करत होता. राहुरी तालुक्यातील एका युवकाची आठ लाखांची फसवणूक झाल्याने त्याने फिर्याद दाखल केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत मांडावा येथून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
Web Title: Ahmednagar Fraud deal was done by wearing commando uniforms