Home क्राईम संगमनेर: वाळू तस्करीसाठी थेट रस्ता बनविला, दोघांवर गुन्हा दाखल

संगमनेर: वाळू तस्करीसाठी थेट रस्ता बनविला, दोघांवर गुन्हा दाखल

Sangamner Crime direct route for sand smuggling, both charged

Sangamner Crime | संगमनेर: वाळू (Sand smuggling) तस्करीसाठी तालुक्यातील नांदूर खंदरमाळचं खैरदरा येथे मुळा नदीपात्रात दोघा तस्करांनी रस्ता केला होता. नागरिकांनी आवाज उठविल्यामुळे राज्यभर हे प्रकरण गाजले होते. कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर तहसीलदार अमोल निकम यांनी गुन्हा दाखल करण्याचे सूचना दिल्याने जांबूत बुद्रुकच्या दोन तस्करांवर शुक्रवारी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुळा पात्रता वाळू तस्करीसाठी रविवारी १३ ला दोन तस्करांनी शासकीय परवानगी न घेता जेसीबीच्या सहायाने वाळू, माती, मुरुमाचा भराव टाकून अर्धा किलोमीटर रस्ता बनविला. हा परिसर वाळू तस्करांचे केंद्रबिंदू असल्याने दिवसरात्र येथे जोमात वाळू तस्करी होते. कारवाई होऊनही तस्कर घाबरत नसल्याने आता तर वाळू वाहतूक सुरळीत करण्यासाठी थेट मुळा पात्रातच रस्ता बनविण्याची मजल तस्करांची गेली आहे.आर्थिक हितसंबध असल्याने त्यांची मुजोरी वाढली आहे. रस्त्याची चर्चा राज्यभर झाल्याने प्रशासनाने रस्ता उखडून टाकला. ग्रामस्थांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रारी केल्याने तातडीने कारवाई करण्यात आली आहे.

वाचा: Ahmednagar News

नांदूर खंदरमाळचे तलाठी युवराजसिंग जारवाल यांच्या फिर्यादीवरून राजू श्रीरंग डोंगरे व अविनाश रोहिदास डोंगरे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक गणेश लोंढे करीत आहे.    

Web Title: Sangamner Crime direct route for sand smuggling, both charged

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here