Home अहमदनगर अडीच कोटीचा बनावट चेक वटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

अडीच कोटीचा बनावट चेक वटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Ahmednagar gang trying to cash a fake check 

अहमदनगर: दिल्ली महापालिकेच्या नावाने असलेला अडीच कोटीचा बनावट चेक बँकेत वटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून यातील चार जणांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे.

याप्रकरणी पोलीस नाईक रविकिरण सोनटक्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

दिल्ली मुन्सिपल कौन्सिल या नावाने अडीच कोटी रुपयांचा एक चेक विपुल वक्कानी, यशवंत देसाई, नरेश बालकोंडेकर हे सावेडी येथील स्टेट बँक शाखेत आले. त्यांनी चेक वटविण्यासाठी दिला. या शाखेतील मॅनेजरला शंका आल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांना संपर्क करून माहिती दिली.  

निरीक्षक घुगे व पोलीस कर्मचारी रवी सोनटक्के, संदीप पवार व इतर कर्मचारी यांनी बँकेत जाऊन खात्री केली तेव्हा सदर चेक बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी विपुल नरेश वक्कानी वय ४०, यशवंत दत्तात्रय देसाई वय ४९, नरेश रामचंद्र बालकोंडेकर वय ३३, राहुल ज्ञानोबा गुळवे वय ४६, संदीप भगत, तुषार आत्माराम कुंभारे सर्व रा. पुणे व विजेंद्र दक्ष रा. दिल्ली या सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील विपुल नरेश वक्कानी वय ४०, यशवंत दत्तात्रय देसाई वय ४९, नरेश रामचंद्र बालकोंडेकर वय ३३, राहुल ज्ञानोबा गुळवे वय ४६ यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २० लाख ९५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल दोन कार, बनावट शिक्के, चेकबुक, मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

Web Title: Ahmednagar gang trying to cash a fake check 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here