Home अहमदनगर साडेअकरा लाखांचा गुटखा पकडला

साडेअकरा लाखांचा गुटखा पकडला

Ahmednagar Gutkha seized 

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर शहरात विक्रीसाठी आणलेल्या गोवा कंपनीचा गुटखा असलेला टेम्पो अन्न प्रशासन व तोफखाना पोलिसांनी संयुक्त कारवाई  करत पकडण्यात आला आहे. . बोल्हेगाव उपनगरात आदेश लॉन जवळ रविवारी रात्री दोन वाजता ही कारवाई केली.

या कारवाईत  एकुण 11 लाख 52 हजार रूपये किंमतीचा गुटखा व चार लाख 46 हजार रूपये किंमतीचा टेम्पो असा 15 लाख 98 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बोल्हेगाव उपनगरात गुटखा असलेला टेम्पो उभा असल्याची माहिती अहमदनगर शहर अन्नसुरक्षा अधिकारी शरद पवार यांना मिळाली होती. अन्नसुरक्षा अधिकारी पवार यांनी नमुना सहायक प्रसाद कसबेकर यांच्यासह तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार गवारे, अकोलकर यांना सोबत घेत बोल्हेगाव गाठले.

मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी उभा असलेला टेम्पो पथकाने पकडला. पथक आल्याची चाहूल लागताच टेम्पो चालक पसार झाला. पकडलेला टेम्पो अन्न प्रशासन कार्यालय आणण्यात आला. त्याठिकाणी अन्न प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी गुटख्याची मोजदाद केली. यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Ahmednagar Gutkha seized 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here