संगमनेर धक्कादायक: डीटोनेटरच्या सहाय्याने जिलेटीनचा स्फोट घडवून एटीएम फोडले
संगमनेर | ATM Theft: संगमनेर तालुक्यात आज सकाळी धक्कादायक घटना समोर आली आहे. डीटोनेटरच्या सहाय्याने जिलेटीनचा स्फोट घडवून चोरट्यांनी इंडिया वन कंपनीचे समनापूर येथे एटीएम फोडले. सुमारे ३ लाखांची रक्कम चोरीस गेली असल्याचा अंदाज आहे.
संगमनेर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या समनापूर याठिकाणी रात्रीच्या वेळी डीटोनेटरच्या सहाय्याने जिलेटीनचा स्फोट घडवून चोरट्यांनी इंडिया वन कंपनीचे एटीएम फोडले व एटीएम मधील ३ लाख रुपयांची रक्कम लंपास केली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी डीटोनेटर वापर केला त्यामुळे मशिनच्या अक्षरश चीथाड्या उडाल्या होत्या. संगमनेर मार्गे असलेल्या कोल्हार घोटी मार्गाच्या कडेला समनापूर इंडिया वन कंपनीचे एटीएम होते. रात्रीच्यावेळी त्याचे स्फोट घडवून रक्कम लंपास केली. या घटनेची माहिती समजताच संगमनेर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, दगडखाणी व विहिरी खोदण्यासाठी साठी डीटोनेटरचा वापर केला जातो मात्र चोरट्यांनी एटीएम डीटोनेटर सहायाने फोडल्याने संगमनेरात एकच खळबळ उडाली आहे.
Web Title: Sangamner detonator exploded the gelatin and blew up the ATM Theft