Home अहमदनगर अहमदनगर हनीट्रॅपचा पर्दाफाश, फेसबुकवरील महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट ट्रक चालकाला पडली महागात

अहमदनगर हनीट्रॅपचा पर्दाफाश, फेसबुकवरील महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट ट्रक चालकाला पडली महागात

Ahmednagar HoneyTrap: हनीट्रॅपचा पर्दाफाश महिलेच्या नातेवाइकांनी त्यास मारहाण करून अर्धनग्न फोटो काढून पैशाची मागणी करून डांबून ठेवले. त्या चालकाच्या पत्नीकडे ज्यादा पैशांची मागणी केली.

Ahmednagar honeytrap exposed, woman's friend request on Facebook cost the truck driver dearly

जामखेड | Jamkhed: जामखेड तालुक्यातील एका महिलेने ट्रक चालकाला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून प्रेमाच्या गप्पा मारून जाळ्यात ओढले. त्यास गुरुवारी (दि.११) जामखेड येथे बोलावून घेतले. तेथे महिलेच्या नातेवाइकांनी त्यास मारहाण करून अर्धनग्न फोटो काढून पैशाची मागणी करून डांबून ठेवले. त्या चालकाच्या पत्नीकडे ज्यादा पैशांची मागणी केली. तिने पोलिसांनी माहिती सांगितली. फोनच्या आधारे पोलिसांनीही त्या महिलेचा शोध घेऊन हनीट्रॅपचा पर्दाफाश केला. एका आरोपीस अटक केली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अहमदपूर (जि. लातूर) तालुक्यातील एका गावातील ट्रक चालकाला जामखेड तालुक्यातील महिलेने फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. त्याच्याशी प्रेमाच्या गप्पा मारत त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यास गुरुवारी (दि.१८) जामखेड येथे बोलावून घरी नेले. त्याचवेळी महिलेचे नातेवाईक तेथे आले. त्यांनी ट्रक म्हटले आहे. चालकाला लाठी-काठीने मारहाण केली. पैशाची मागणी केली, तसेच पैसे न दिल्याने जबरदस्तीने कपडे काढायला लावून त्या महिलेसोबत अर्धनग्न अवस्थेत जबरदस्तीने फोटो काढले, तसेच पैसे दिले नाही तर अत्याचाराची खोटी तक्रार नोंद करील, अशी धमकी दिली. त्यामुळे चालकाने घाबरून काही पैसे महिलेला दिले; परंतु महिला व तिच्या नातेवाइकांनी आणखी पैशांसाठी डांबून ठेवले. चालकाच्या पत्नीला फोन करून अधिकच्या पैशांची मागणी केली. त्याच्या पत्नीने ११२ नंबरवर कॉल केला. पोलिसांना चालकाच्या मोबाइल लोकेशनवरून त्याचा शोध लागला, असे फिर्यादीत म्हंटले आहे.

पोलिसांनी सविस्तर चौकशी चालकाच्या तक्रारीवरून महिला व तिच्या नातेवाइकांविरुद्ध अन्यायाने कैदेत ठेवणे, खंडणी, दुखापतीचा गुन्हा नोंद केला आहे. एका आरोपीस पोलिसांनी अटक केली असून, इतर तिघांचा शोध घेत घेतला जात आहे. पोलिस निरीक्षक महेश पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडे, पोलिस उपनिरीक्षक अनिल भारती, पोलिस कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Ahmednagar honeytrap exposed, woman’s friend request on Facebook cost the truck driver dearly

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here