Home अहमदनगर नगर रुग्णालय आग: सहा जणांवर कारवाईचा बडगा

नगर रुग्णालय आग: सहा जणांवर कारवाईचा बडगा

Ahmednagar hospital fire Action against six personshmed

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून ११ जणांचा जीव गेल्याच्या दुर्घटनेत जबाबदार असलेले जिल्हा चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, दोन वैद्यकीय अधिकारी व एक स्टाफ नर्स यांना निलंबित करण्यात आले आये. तर तर दोन स्टाफ नर्सची सेवा समाप्त करण्यात आली आहे.

सोमवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. रविवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा रुग्णालयाची पाहणी करत घटनेची माहिती घेतली. सोमवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदारांनी डॉ. पोखरणा यांच्याविरोधात रोष व्यक्त केला. याबाबत कारवाई करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला. या घटनेचे सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिलेले आहे.

डॉ. सुनील पोखरणा (जिल्हा शल्य चिकित्सक), डॉ. सुरेश ढाकणे ( वैद्यकीय अधिकारी), डॉ. विशाखा शिंदे (वैद्यकीय अधिकारी), सपना पठारे (स्टाफ नर्स) यांना निलंबित करण्यात आले आहे तर आसमा शेख (स्टाफ नर्स), चन्ना अनंत(स्टाफ नर्स) यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.

Web Title: Ahmednagar hospital fire: Action against six persons

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here