हॉटेल राजयोग वेश्या व्यवसायावर छापा, दोन मुली ताब्यात
अहमदनगर | Ahmednagar: नगर तालुका पोलिसांनी दौंड रोडवरील खंडाळा शिवारात हॉटेल राजयोगवर छापा टाकून कुंटणखाण्यावर (prostitution business)कारवाई केली आहे. या हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु होता. यावेळी देहविक्री करणाऱ्या दोन मुलींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ही कारवाई केली आहे.
हॉटेल मालक अक्षय कर्डिलेसह ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हॉटेल राजयोग येथे कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून मंगळवारी सायंकाळी सहायक पोलीस निरिक्षक राजेंद्र सानप यांच्या नेतृत्वात नगर तालुका पोलिसांनी कारवाई केली.
हॉटेल मालक अक्षय अनिल कर्डिले, सौरभ अनिल कर्डीले यांच्यासह विकी मनोहरलाल शर्मा, गणेश मनोहर लाड, संदीप पंडीत जाधव यांच्याविरोधात स्त्रीया व मुलींचा अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा सन १९५६ च्या कलम ३,४,५ प्रमाणे गुन्हा दाखल करत अटक केली.
Web Title: Ahmednagar Hotel Rajyog Print on the prostitution business