Home अहमदनगर अहमदनगर: शॉपी मॉल आगीत खाक, १ कोटी ७५ लाख रुपयांचे नुकसान

अहमदनगर: शॉपी मॉल आगीत खाक, १ कोटी ७५ लाख रुपयांचे नुकसान

Ahmednagar Khaki in shop mall fire, loss of Rs 1 crore 75 lakh

Ahmednagar | शिर्डी  | Shirdi: शिर्डी शहरानजीक नगर मनमाड महामार्गालगत असलेल्या निघोज येथील जगदंब ट्रेडर्स सुपर शॉपी मॉलला रविवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटने आग (Fire) लागून १ कोटी ७५ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती संचालक दत्तात्रय वाळुंज यांनी दिली.

शिर्डी पोलीस ठाण्यात दत्तात्रय नाथाजी वाळुंज,वय 48, रा.निमगाव कोर्‍हाळे ता.राहाता यांनी रविवार दि.5 रोजी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,  प्रसन्न सोमनाथ भोसले, सचिन प्रकाश खाबिया, एकनाथ हिरामण लाड, मनिषा दत्तात्रय वाळुंज सर्व रा.निमगाव कोर्‍हाळे येथील असून आम्ही एकत्रित जगदंब ट्रेडर्स सुपर शॉपी नावाचे मॉल चालवत आहे. सदर मॉलच्या देखरेखीसाठी आम्ही वॉचमन ठेवला आहे. तो रात्री देखरेख करत असतो. नेहमीप्रमाणे दि.4 जून रोजी रात्री 8 वाजता आम्ही शॉपी बंद करून घरी निघून गेलो होतो.

त्यानंतर दि.5 रोजी मध्यरात्री दोन वाजता वॉचमन रोहन जगताप याने फोन करून सांगितले की, आपल्या जगदंब ट्रेडर्स सुपर शॉपीला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली आहे. तेव्हा तुम्ही लवकर या असे कळविल्याने मी माझ्या सहकार्‍यांना संपर्क साधून आम्ही सर्व घटनास्थळी पोहचलो. त्यानंतर अग्निशमन दल राहाता नगरपालिका, शिर्डी नगरपरीषद, साईबाबा संस्थानच्या अग्निशमन दल यांना फोनवरून कळवले असता अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल होवून अग्निशमन दलाच्या जवानांनी सदरची आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करून आग विझवली.

जगदंब शॉपीमधील किराणा माल,इलेक्ट्रिक वस्तू,घरगुती भांडी, रॅक,मशिनरी जळून खाक झाल्याने यामध्ये एकूण 1 कोटी 75 लाख रुपयांचा मालाचे नुकसान झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच शेजारच्या एकनाथ हिरामन लाड यांच्या साई फर्निचर या दालनास आग लागून दुकानातील सर्व फर्निचर जळून खाक झाले. या आगीत मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: Ahmednagar Khaki in shop mall fire, loss of Rs 1 crore 75 lakh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here