Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: सहा वर्षीय चिमुरडीला धमकी देवून तिच्यावर अत्याचार

अहमदनगर ब्रेकिंग: सहा वर्षीय चिमुरडीला धमकी देवून तिच्यावर अत्याचार

6-year-old girl threatened and Sexual abused

Ahmednagar | Shevgaon | शेवगाव: शेवगाव शहरात गरीब कुटुंबातील एका ६ वर्षीय अल्पवयीन मुलीला धमकी देवून तिच्यावर अत्याचार (Sexual abused) केल्याची घटना बुधवारी (१ जून) घडली. शुक्रवारी (३ जून) अत्याचारीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन रविंद्र मोहन कोपरगे (वय-३५) रा.इंदिरानगर,शेवगाव याच्या विरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादीनुसार आम्ही शहरातील इंदिरानगर भागात कुटुंंबासह राहत आहोत. मोलमजुरी हे आमच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. रविंद्र कोपरगे हा आमच्या घरासमोरच एकटाच रहाण्यास होता. बुधवारी रात्री ८ वाजता घरात सर्व जण जेवण करीत असताना सहा वर्षाची मुलगी रडत घरी आली.

तिने कोपरगे याने धमकावत कपडे काढून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करुन अत्याचार केल्याचे सांगितले. घरातील सर्वजण त्याच्याकडे गेलो असता तो पळून गेला. त्यानंतर मुलीला शेवगाव ग्रामिण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करून पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे दाखल केल्याची फिर्याद दाखल केली.

यावरून पोलिसांनी रविंद्र मोहन कोपरगे याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष शेळके करीत आहेत.

Web Title: 6-year-old girl threatened and Sexual abused

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here