Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आणखी ८ गावे लॉकडाउन, संगमनेरातील तीन गावे

अहमदनगर जिल्ह्यात आणखी ८ गावे लॉकडाउन, संगमनेरातील तीन गावे

Ahmednagar Lockdown another 8 village Lock

अहमदनगर | Ahmednagar Lockdown: कोरोना रुग्णांची संख्या १० पेक्षा अधिक झाल्याने जिल्ह्यातील आणखी आठ गावांमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी घेतला आहे. पारनेर तालुक्यातील चार गावे, नेवासा तालुक्यातील एक आणि संगमनेर तालुक्यातील तीन गावांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता बंद झालेल्या गावांची संख्या ६८ झाली आहे.

धार्मिक स्थळांसह, दुकाने, वस्तू विक्री, सेवा बंद राहणार आहेत. नागरिकांना गावात येण्यास व बाहेर जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा मात्र सुरु राहणार आहेत. संबंधित गावात सक्रीय रुग्णांची संख्या १० पेक्षा अधिक असल्याने गावे पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे.

बंद केलीली गावे:

नेवासा: चांदा

पारनेर: निघोज, वाडेगव्हान, टाकळी ढोकेश्वर, अळकुटी

संगमनेर: राजापूर, पिंप्री लौकी, आजमपूर

Web Title: Ahmednagar Lockdown another 8 village Lock

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here