Home अहमदनगर अल्पवयीन मुलीशी लग्न करून छळ, पती. सासरा, आईविरोधात गुन्हा

अल्पवयीन मुलीशी लग्न करून छळ, पती. सासरा, आईविरोधात गुन्हा

Crime News Torture by marrying a minor girl

अहमदनगर | Crime News: केवळ १४ वर्षाच्या मुलीचा तिच्या आईनेच लग्न लावून दिल्याचे समोर आले आहे. लग्नानंतर दोन वर्षातच मातृत्व लादले. तसेच पतीने मुलीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण करण्यात आली. याच जाचाला कंटाळून पिडीत मुलीने चाईल्ड लाइनच्या मदतीने सोमवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

याप्रकरणी पिडीत मुलीची आई, पती, सासरा विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पिडीतेचे वय १४ वर्ष २ महिने असताना २२ एप्रिल २०१८ रोजी आईने तिचे लग्न लावून दिले. लग्न झाल्यावर पतीने तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तो तिला वारंवार मारहाण करीत असे.. पतीला जुगाराचे व्यसन होते. जुगारात पैसे हरला की, पत्नीस मारहाण करीत असे.पिडीतेला मुलगी झाल्यानंतर ती आईकडे राहण्यास आली. तेथे येऊनही पती तिला त्रास देत होता. अखेर याबाबत पिडीत मुलीने चाईल्ड लाइन संस्थेशी संपर्क करून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Crime News Torture by marrying a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here