Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात १५ मे ते १ जूनपर्यंत कडक निर्बंधात वाढ

अहमदनगर जिल्ह्यात १५ मे ते १ जूनपर्यंत कडक निर्बंधात वाढ

Ahmednagar Lockdown Update Collector

अहमदनगर | Ahmednagar Lockdown Update: कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्यास प्रतिबंध व्हावा म्हणून जिल्हाधिकारी यांनी १५ मे २०२१ ते १ जून २०२१ सकाळी ७ वाजेपर्यंत अतिरिक्त अतिरिक्त निर्बंध वाढविले आहे. तसेच १५ जून पर्यंत असलेले निर्बंध सुरु राहतील असा आदेश काढण्यात आला आहे.

अतिरिक्त निर्बंध खालीलप्रमाणे:

  • वाहतुकीच्या कुठल्याही माध्यमाने राज्याबाहेरून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे त्याने असा प्रवेश करण्यापूर्वी जास्तीत जास्त ४८ तास आधीचे निगेटिव्ह आरटीपीसीआर प्रमाणपत्र असणे बंधनकारक असेल.
  • राज्य शासनाकडील दिनांक १८ एप्रिल २०२१ व दिनांक १ मे २०२१ या अदेशान्वे संवेदनशील क्षेत्रामधून राज्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकरिता लागू असलेले निर्बंध हे देशातील कोणत्याही क्षेत्रातून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकरिता लागू असतील.
  • कार्गो वाहतुकीबाबत दोन पेक्षा अधिक नसतील इतक्या व्यक्तींना (वाहक व मदतनीस) कार्गो वाहनासोबत प्रवासास मुभा राहील. राज्याबाहेरून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या कार्गो वाहतुकीबाबत जिल्ह्यात प्रवेश करताना त्याने जिल्ह्यात असा प्रवेश करण्यापूर्वी जास्तीत जास्त ४८ तास आधीचे निगेटिव्ह आरटीपीसीआर प्रमाणपत्र असणे बंधनकारक असेल. आणि असे प्रमाणपत्र सात दिवस वैद असेल.
  • स्थानिक आपत्ती, व्यवस्थापन, प्राधिकरणाने ग्रामीण भागातील बाजार आणि कृषी उत्पन्न बाजारसमित्यामध्ये कोव्हीड अनुरूप वर्तनाचे पालन होत असलेबाबत खात्री करावी व अशा ठिकाणी कोव्हीड अनुरूप वर्तनाचे पालन सुनिश्चित करणे कठीण असल्यास अतिरिक्त निर्बंध लागू करण्याची कारवाई करावी. किवा परिस्थितीनुसार असे बाजार कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करण्याची कार्यवाही करावी.
  • दुध संकलन किंवा वाहतूक व प्रक्रिया ही कुठल्याही निर्बंधाविना चालू असेल. दुधाच्या किरकोळ विक्रीबाबत यापूर्वीच्या आदेशातील निर्बंध कायम राहतील.
  • या व्यतिरिक्त आधीच्या आदेशातील सर्व निर्बंध पूर्णपणे लागू राहतील.

कोणत्याही व्यक्तीने निर्बंध मोडल्यास फौजदारी गुन्ह्यास ती व्यक्ती अथवा संस्था पात्र राहील.

Web Title: Ahmednagar Lockdown Update Collector

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here