Home अकोले रेशनच्या मालाबाबत चौकशी होऊन कठोर कारवाई करण्याची मागणी

रेशनच्या मालाबाबत चौकशी होऊन कठोर कारवाई करण्याची मागणी

Akole Demand for inquiry into the ration goods 

अकोले | Akole: बुधवार दि १२/०५/२०२१ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास राजूर पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोल पंपासमोर वाहनातून रेशनचे गहू तांदुळ अंदाजे ४५० ते ५०० क्विंटल धान्य माहेर गावी जात असतांना पकडण्यात आले. सबंधीतांची चौकशी होऊन त्यांचेवर गुन्हे करून कठोर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांचेकडे माजी आमदार वैभव पिचड यांनी केली आहे.

राजुर पॉलिस स्टेशनने खालीलप्रमाणे गाड्या पकडण्यात आल्या आहेत.

MH०४ -५२११ (३२+४२०७४, ९४+५०= १४४ + ७८ २९६ कट्टे)

गाडी क्र. MH १५ SU-९०५७ (२०५+ ४४= १४९ कट्टे)

गाडी क्र. MH १७ AG-३८८३ (९६+५८+५२= २०६ कट्टे)

गाडी क्र. MH १७ २९०० (१०+६९+९८+२६= २०३ कट्टे)

वरील गाड्यांमधून रेशनचा माल काळ्या बाजारात जात असतांना पकडण्यात आला. याबाबत तहसिलदार यांचेकडे चौकशी केली असता सदर गाड्या ह्या परवानगीच्या नाहीत असे त्यांनी सांगितले.

परवानगोच्या गाड्या खालीलप्रमाणे आहेत. १) MHR७ BY ७२४३

२) MHR७२५१३

३) MHR४ BG २३२५

४) MHTY BG २५२३

(५) MHR४ AH ६९५९

६) MHOY DK ६८४४

(७) MHR७ AG४०१०

अशा आहेत. संबंधीत बाबतीत चौकशी केली असता सदर मालाच्या टोपीवर गोडाऊन किपर अथवा तालुका पुरवठा अधिकारी यांची कोणाचीही सही अथवा तारखेचा उल्लेख नाही तसेच सदर टोपीवर गाडी क्रमांकाचा व गाडी मालकाचा अथवा ड्रायव्हरचा उल्लेख नाही तसेच त्यावर कोणत्याही ड्रायव्हर नाही असे निदर्शनास आले आहे. तसेच गोडाऊन किपर यांच्या कार्यालयात सायंकाळी ५.३० ते ६०० दरम्यान मी स्वतः समक्ष जाऊन पाहणी केली असता त्यांच्या कोणत्याही  रजिस्टरला  कोणत्या गाडीचा किती माल दिला अथवा गाडी पाठविल्याचे नोंद नाही. या सर्व बाबतीत असे निर्देशनास येते की. पकडलेल्या गाड्या आणि पुरवठा विभागाकडून परवानगी घेतलेल्या गाड्यांमध्ये कोणत्याही प्रकार नाही तसेच संबंधीत माल नेमका कुठे पाठविण्यात आला यांचेही नोंद नाही. श्री. संतोष परते राजुर ता. अकोले, हे पोलिस स्टेशन राजूर व तहसील कार्यालय, अकोले येथे वेगवेगळ्या प्रकारचे बनावट कागदपत्र दाखवून हा माल माझा आहे. असे सांगतांना निर्दशनास आले आहे.

सध्या कोरोनाचे अत्यंत बिकट असे संकट आहे. कोणाच्याही हाताला काम धंदा नाही सध्या लाकडाऊनमुळे घराच्या बाहेर पडता येत नाही अकोले तालुका हा अति दुर्गम व डोंगराळ असुने खेड्या पाड्यांनी विखुरलेला आहे. तालुक्यातील सर्व जनतेचे अत्यंत हाल अपेष्टा चालू आहे. गेल्या २ ते ३ महिन्यापासून रेशनचे धान्य गोरगरीब जनतेला मिळत नाही अशातच मात्र रेशनचे धान्य काळ्या बाजारात विकण्यासाठी जात आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात अधिका-यांचे व ठेकेदारांचे साखळी आहे असे निर्दशनास येत आहे. गाड्यांमध्ये असलेला माल हा चेक करण्यात यावा तसेच गोडावून मध्ये असलेला माल हा वरीष्ठ अधिका-यांमार्फत चेक करण्यात यावा व यामध्ये जे कोणी दोषी असतील अशांवर आपले महसुल विभागामार्फत गुन्हे दाखल करून सबंधीतांवर कठोर अशी कारवाई करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे.

Web Title: Akole Demand for inquiry into the ration goods 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here