शिवार रस्त्यात एका महिलेवर सामुहिक अत्याचार
अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नगर तालुक्यातील निंबोडी शिवारात एका ३० वर्षीय महिलेवर सामुहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
पिडीत महिलेने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पिडीत महिला कामानिमित्त आष्टी येथून अहमदनगर येथे आली होती. तिचे काम झाल्यावर निंबोडी शिवारातून जात असताना तिच्यावर तीन नराधमांनी सामुहिक अत्याचार केला.
ही घटना घडल्यानंतर पिडीत महिलने भिंगार पोलीस स्टेशन गाठले व पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिच्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय माळी याच्यासह त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Ahmednagar Mass atrocities on a woman in the street