Home अकोले अकोले तालुक्यात ठाकर समाजाची घरे जळून भस्मसात, कुटुंब रस्त्यावर

अकोले तालुक्यात ठाकर समाजाची घरे जळून भस्मसात, कुटुंब रस्त्यावर

Akole Taluka Kombhalane houses burnt down    

अकोले | Akole: तालुक्यातील कोंभाळणे येथील ठाकर वस्ती येथील युवराज गांगड व अन्य तीन घरे आगीत भस्मसात झाल्याची घटना घडली आहे. या आगीत शेळ्या, मोटारसायकल, पैसे, धान्य, कपडे, कागदपत्रे जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे चार कुटुंब उघड्यावर आली आहेत.

 याबाबत माहिती अशी की, कोंभाळणे येथील दोन किलोमीटर अंतरावर ठाकर वस्ती आहे. युवराज गावंडे, सुनीता गावंडे, सखाराम गावंडे, असे चार कुटुंब व सात मुले राहतात. नारायण गाव येथे शेतीच्या कामावर जाऊन या आदिवासी ठाकर कुटुंबांनी आपल्या घरात साठविली होती. संगमनेर येथे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी कुटुंबीय गेले होते. यामध्ये दोन महिला व छोटी मुले घरात होती.

दुपारी साडे अकरा वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आपल्या घरास आग लागल्याचा संशय आल्याने महिलांनी धावपळ केली. मात्र जवळपास पाणी उपलब्ध नसल्याने त्यांना झोपड्या विझविण्यास अपयश आले. घरातील ४० पोती धान्य, शेळ्या, पैसे, कागदपत्रे, संसार उपयोगी साहित्य जळून भस्मसात झाली आहे. घरात झोपलेला दोन वर्षाचा मुलगा, महिलांनी आगीत घुसून बाहेर काढला तर बकरीचे पाय ओढत बाहेर काढले.

डोळ्यासमोर आपला संसार उध्वस्त होत असताना पाहिल्याने कुटुंबियांचे अश्रू अनावर झाले. ही कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.  आमदारांनी तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन कुटुंबियांना दिले आहे.

Web Title: Akole Taluka Kombhalane houses burnt down    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here