Home अहमदनगर दोघी बहिणी माहेरी आल्या की, युवक करीतो असे काही….

दोघी बहिणी माहेरी आल्या की, युवक करीतो असे काही….

Ahmednagar molested the two sisters and molested them

Ahmednagar | अहमदनगर: दोघी बहिणींची छेड काढून त्रास देत त्यांचा विनयभंग (molested) केल्याने रोहन बाबासाहेब कराड (वय अंदाजे 23, रा. शनिमंदिराजवळ, शास्त्रीनगर, केडगाव) याच्याविरूध्द कोतवाली पोलीसी ठाण्यात गुन्हा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी नगर तालुक्यातील एका गावामध्ये सासर असलेल्या व अहमदनगर शहरातील एका उपनगरात माहेर असणाऱ्या पीडित महिलेने याबाबत फिर्याद दाखल केली आहे.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी व माझी बहिण आमचे लग्न झाले आहे. आम्ही माहेरी आल्यानंतर रोहन कराड हा आमच्याकडे बघून इशारे करणे, शिट्टी वाजविणे, आमचा पाठलाग करणे, असे गैरवर्तन करत असतो.

रविवार, 6 मार्च 2022 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मी आणि बहिण अंगणात उभ्या असताना रोहनने आमच्याकडे पाहून खडा फेकला, आम्ही त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्याने गैरकृत्य करत विनयभंग (molested) केल्याचे  पीडित महिलेले दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी विनयभंग कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

Web Title: Ahmednagar molested the two sisters and molested them

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here