Home अकोले अकोलेत सोयाबीन चोरी करणारी टोळी जेरबंद,  19 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त...

अकोलेत सोयाबीन चोरी करणारी टोळी जेरबंद,  19 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त  

Soybean theft gang arrested in Akole

Akole Crime | अकोले:  मागील काही दिवसांपासुन अकोले पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेतकऱ्यांची तयार केलेली सोयाबीन चोरी (Theft) जाण्याच्या घटना घडत होत्या. याबाबत अकोले पोलीस स्टेशनला शेतकऱ्यांचे गुन्हे दाखल करुन त्याबाबत तपास चालु होता. सदर प्रकरणे वारंवार घडत असल्याने मा. पोलीस अधिक्षक सो अ.नगर यांनी शेतीमाल चोरीबाबत सखोल तपास करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार अकोले पोलीस स्टेशन कडील अधिकारी व कर्मचारी असे पोलीस स्टेशन हद्दीत गस्त, नाकाबंदी व कोंम्बीग ऑपरेशन अश्या कारवाया चालु असताना दिनांक 06.03.2022 गुप्त बातमीदारामार्फत सोयाबीन चोरी करुन तिची विक्री करण्याचे वास्तव्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली असता पोलीस पथकाने छापा टाकुन चार इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे कडे चौकशी केली असता त्यांनी सोयाबीन चोरी (Theft) केले बाबत कबुली दिली आहे.

अजय बाळु मेंगाळ रा गर्दणी, लहु वाळीबा मेंगाळ रा तांभोळ, विजय अशोक खोडके रा खानापुर, भिमराज गंगाराम मेंगाळ रा खानापुर असे सोयाबीन चोरी करणाऱ्यांची नावे असुन त्यांना तपासअंती गुन्हा रजि नं 29/2022 भा.द.वि कलम 379, 34 प्रमाणे गुन्हयात अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना दिनांक 10.03.2022 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली होती.

पोलीस कस्टडी रिमांड कालावधीमध्ये आरोपी यांना विश्वासात घेवुन विचारपुस त्यांचे साथीदारांबाबत विचारपुस केली असता त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे साथीदारांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असुन त्यांची नावे मयुर लहानु मुर्तडक रा राजुर (Rajur) ,  नंदु रामा भले रा दिंगबर, राजुर(Rajur) अशी असुन त्यांना देखील सदर गुन्ह्यात अटक केली आहे.

सदर आरोपी यांचेकडुन रुपये 1,00,000/- रुपये किमंतीची 25 क्विंटल सोयाबीन ही जप्त करण्यात आली असुन इतर आरोपी यांचेकडुन चोरी करतेवेळी वापरलेल्या चारचाकी वाहने अनुक्रमे 1)5,00,000/- रु कि ची एम एच 12 डी टी 4108 , 2)7,00,000/- रु कि ची एम एच 26 एच 9193, 3)6,00,000 रु कि ची  एम एच 14 ए झेड 0511, 4) 25,000/- रुपये किमंती बजाज डिस्कवर कंपनिची मोटार सायकल नं एम एच 17 ए पी 1374  असा एकुण 19,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच जप्त मुद्देमालातील पिक अप गाडी नंबर एम एच 12 डी टी 4103 ही आरोपी नामे विजय अशोक खोडके व भिमराज गंगाराम मेंगाळ यांनी ओतुर ता जुन्नर जि पुणे येथुन चोरी केलेबाबत निष्पन्न झाला असुन त्याबाबत ओतुर पोलीस स्टेशनला गुरनं 29/2022 भा.द.वि. कलम 379 प्रमाणे दाखल आहे.सदर अटक आरोपी यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी खालील प्रमाणे सोयाबीन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली असुन अधिक तपास चालु आहे. 

1)अकोले पोलीस स्टेशन गुरनं 29/2022 भा.द.वि. कलम 379,34 प्रमाणे रेडे शिवार ता अकोले जि अ.नगर 

2)अकोले पोलीस स्टेशन गुरनं 43/2022 भा.द.वि. कलम 457,380, प्रमाणे भोळेवाडी,कोतुळ शिवार ता अकोले

3)ओतुर पोलीस स्टेशन जि पुणे गुरनं 29/2022 भा.द.वि. कलम 379 प्रमाणे

सदर आरोपी नं 1 ते 6 हे सध्या पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असुन त्यांचेकडे गुन्ह्यांचा तपास चालु असुन त्यांचेकडुन अधिक गुन्हे केल्याचे व त्यांचे साथीदार निष्पन्न होण्याची शक्यता असुन त्याबाबत तपास सुरु आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील सो व मा. अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर मॅडम व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल मदने यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि मिथुन घुगे, पोउपनिरी भुषण हांडोरे, सफौ मैनुद्दीन शेख,पोहेकॉ लांडे,  मपोना संगिता आहेर ,पोकॉ अविनाश गोडगे, पोकॉ सुयोग भारती,पोकॉ आनंद मैड,पोकॉ विजय आगलावे, राजुर पोलीस स्टेशनचे पोकॉ अशोक गाडे, अपर पोलीस अधिक्षक कार्यालयाचे पोना फुरकान शेख यांनी केली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास हे अकोले पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत.

नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपले गावात किंवा परिसरात कोठेही संशयीत रित्या व्यक्ती दिसुन आल्यास तात्काळ पोलीस ठाण्यास अथवा ग्राम सुरक्षा दल यांना कळवा असे आवाहन मा. पोलीस अधिक्षक सो अ.नगर यांनी केले आहे.

Web Title: Soybean theft gang arrested in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here