Home अहमदनगर अहमदनगर मनपा अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

अहमदनगर मनपा अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

Ahmednagar Municipal Officer caught in bribery trap

अहमदनगर | Ahemdnagar: महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागचे प्रमुख व उप आरोग्यअधिकारी डॉ. एन.एस. पैठणकर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहे. एसीबीच्या नाशिकच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मोठी रक्कम घेताना आढळून आल्याची माहिती आहे.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागचे प्रमुख व उप आरोग्यअधिकारी डॉ. एन.एस. पैठणकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका ठेकेदाराकडून लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे. पैठणकर नेहमीच चर्चेत राहिले आहे. अनेकवेळा नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात तक्रारी केल्या होत्या. मात्र आयुकातांकडून कोणतेही कारवाई करण्यात आलेली नव्हती.

पैठणकर यांच्याकडून लाचलुचपत पथकाने मोठी रक्कम हस्तगत केली आहे. पैठणकर यांनी कंपनी ठेकेदारांकडून पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. यामधील अडीच लाख रुपये रंगेहाथ घेताना पकडले आहे. ही कारवाई एसीबीच्या नाशिकच्या पथकाकडून करण्यात आली आहे

Web Title: Ahmednagar Municipal Officer caught in bribery trap

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here