Home संगमनेर संगमनेर शहरातील शोरूममधील तीन लाख चोरीला

संगमनेर शहरातील शोरूममधील तीन लाख चोरीला

Sangamner city showroom cash theft 

संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरातील कोल्हार घोटी राज्यमार्गावरील शिरोडे होंडाई या चार चाकी शोरूममधील रोखपाल कक्षातून अज्ञात चोरट्याने ३ लाख १३ हजार ८१२ रुपये चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना १५ ते १६ फेब्रुवारी दरम्यान घडली.

याप्रकरणी शिरोडे होंडाईचे व्यवस्थापक वैभव रामदास येवला यांनी संगमनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शहरातून जाणाऱ्या कोल्हार घोटी राज्यमहामार्गावरील शिरोडे होंडाई या चार चाकी वाहनाच्या  रोखपाल कक्षातून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम चोरून नेली आहे. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख अधिक तपास करीत आहेत.  

Web Title: Sangamner city showroom cash theft 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here