Home अहमदनगर Murder | अहमदनगर ब्रेकिंग: वडापावच्या वादातून तरुणाचा खून

Murder | अहमदनगर ब्रेकिंग: वडापावच्या वादातून तरुणाचा खून

Ahmednagar Murder of a youth due to Vadapav dispute

अहमदनगर | Ahmednagar Crime:  वडापाव खरेदीवरून झालेल्या वादातून एका तरूणाचा खून (Murder) झाल्याची घटना नवनागापूरात घडली आहे.  प्रविण रमेश कांबळे (वय ३५ रा. बालिकाश्रम रोड, सावेडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

दरम्यान या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा आरोपींविरूध्द गुन्हा (Crime) दाखल करण्याचे काम दुपारी सुरू होते. पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली.

प्रविण कांबळे हा मंगळवारी नवनागापूरातील एका वडापाव गाडीवर वडा घाण्यासाठी गेला होता. त्याला वडापाव २० रूपयाला असल्याचे सांगितल्यानंतर त्याने पाच रूपये कमी करण्यास सांगितले. त्यावरून वडापाव दुकानदार व प्रविण यांच्यात वाद झाले. या वादातूनच प्रवीणची हत्या करण्यात आली.

या वादात प्रविणला मारहाण करून त्याचा खून करण्यात आला आहे. या प्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.  सहायक निरीक्षक आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Ahmednagar Murder of a youth due to Vadapav dispute

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here