Home अहमदनगर शेतात पडक्या खोलीत महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

शेतात पडक्या खोलीत महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

Kopargaon Found of a woman's Dead body in a collapsed room

Ahmednagar | Kopargaon | कोपरगाव: तालुक्यातील घारी शिवारात एका अनोळखी महिलेचा मृतदेह (Dead Body) आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.  या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, घारी गावच्या शिवारात शिर्डी-लासलगाव रस्त्यालगत दौलत दामू होन यांच्या मालकीचे शेतात पडक्या खोलीत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.

सदर महिलेचे वय 25 असून तिचा गळा आवळल्याच्या खुणा पोलिस तपासात दिसून आल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Kopargaon Found of a woman’s Dead body in a collapsed room

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here