Home अहमदनगर अहमदनगर: टपरीचालकाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून झाल्याने खळबळ

अहमदनगर: टपरीचालकाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून झाल्याने खळबळ

Ahmednagar News: टपरीचालकाचा डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून खून (Murder) झाल्याने खळबळ उडाली.

Ahmednagar Murder Tapri driver was stabbed to death with a sharp weapon

श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथील टपरीचालकाचा डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून खून झाल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास नगर-दौंड महामार्गावरील हॉटेल मेजवानी शेजारी ही घटना घडली. दशरथ साहेबराव शिर्के (वय ६५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

घटनेनंतर मृताचा मुलगा श्रीरंग शिर्के यांनी येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रामा राजू बरकडे, बिट्या राजू बरकडे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, सहायक पोलिस निरीक्षक समीर अभंग, पोलिस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल बडे घटनास्थळी भेट दिली. नगर-दौंड महामार्गालगत असलेल्या शिरसगाव फाटा येथे मृत दशरथ शिर्के यांची चहाची टपरी आहे.

मृत शिर्के यांची हॉटेल मेजवानीजवळ टपरी आहे. या हॉटेल परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रात्री दोघे जण शिर्के यांच्या टपरीजवळ आल्याचे दिसत आहे. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Ahmednagar Murder Tapri driver was stabbed to death with a sharp weapon

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here