Home अहमदनगर दुर्दैवी घटना: तलावात बुडून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू

दुर्दैवी घटना: तलावात बुडून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू

Ahmednagar News 11-year-old boy drowns in lake

कर्जत | Ahmednagar News: ११ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी कर्जत तालूक्यातील निंबे येथे घटना घडली आहे. साजन सावंत असे या मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो उस तोडणी कामगाराचा मुलगा होता. या दुर्दैवी घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाटोदा तालुक्यातील उस तोडणी कामगार निंबे येथे राहण्यास आहेत. आई धुणे धुण्यासाठी तलावावर गेली असताना तो आईसोबत गेला होता. मात्र आई धुणे धूत असताना आईची नजर चुकवून बाजूला गेला असता तो तलावात बुडाला. काही वेळाने या दुर्घटनेची माहिती समजली. यामध्ये बुडून मुलाचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Ahmednagar News 11-year-old boy drowns in lake

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here