Home महाराष्ट्र महाराष्टाच्या चिंतेत भर: या तीन जिल्ह्यात आढळले डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण

महाराष्टाच्या चिंतेत भर: या तीन जिल्ह्यात आढळले डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण

Delta Plus Virus in Maharashtra

Delta Plus Virus: SARS-CoV-२ डेल्टा-प्लस व्हेरिएंटचे ७ रुग्ण रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर या तीन जिल्ह्यातील गोळा केलेल्या नमुन्यात आढळून आले आहेत. याअगोदरच राज्यात डेल्टा-प्लस व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असे तज्ञांनी सांगितले आहे.

दरम्यान हा विषाणू किती ठिकाणी पसरला आहे हे समजून घेण्यासाठी आणखी नमुने तपासणीसाठी पाठविले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 “आम्हाला नवी मुंबई, पालघर आणि रत्नागिरीमध्ये डेल्टा-प्लस सापडला. त्यानंतर, आम्ही आणखी नमुने पाठविले, परण अंतिम अहवाल अपेक्षित आहे, ”असे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (डीएमईआर) चे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.

डेल्टा प्लस चे सातपैकी पाच रुग्ण हे रत्नागिरी जिल्ह्यात आढळून आले आहेत. रत्नागिरी जिल्हा हा सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या जिल्ह्यात येतो. ज्या पाच जणांमध्ये हा विषाणू आढळून आला आहे ती गावे बंद करण्यात आली आहे.

दरम्यान, गर्दी वाढली आणि नियम पाळले गेले नाहीत तर एक किंवा दोन महिन्यांत करोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात येण्याची भीती टास्क फोर्सने दिली आहे.  महाराष्ट्रात डेल्टा प्लस हा  प्रकार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण बनू शकतो असे तज्ञांनी सांगितले होते. 

Web Title: Delta Plus Virus in Maharashtra

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here