Home अहमदनगर सदाभाऊ खोत भेटले अण्णांना, विविध विषयांवर चर्चा

सदाभाऊ खोत भेटले अण्णांना, विविध विषयांवर चर्चा

Sadabhau Khot met Anna hajare 2

सुपा: माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे (Sadabhau Khot met Anna hajare) यांची भेट राळेगणसिद्धी येथे घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासंदर्भात आपण सरकारशी बोलावे अशी मागणी केली. नवीन कृषी कायद्यावर चर्चा केली. अण्णाच्या तब्बेतीची विचारणा केली. अशी माहिती भेटीनंतर पत्रकारांना दिली.

यावेळी पत्रकारांनी सद्यस्थितीबाबत विचारणा केली असता, सत्ताधारी पक्ष जनतेचा विचार करण्यापेक्षा स्वतःचे पक्ष वाढवताना दिसत आहेत. करोनाच्या नावाखाली विकासकामे होत नाहीत. जनतेने मोर्चे काढायचे नाही, आंदोलने करायचे नाही. मागील सरकारने दिलेले मराठा आरक्षण या सरकारला टिकवता आले नाही. सरकारला मुळात मराठा आरक्षण देण्याची मानसिकता नाही अशी टीका त्यांनी सरकारवर केली. आपले स्वतःचे पक्ष वाढविण्यात हे सरकार व्यस्त असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

Web Title: Sadabhau Khot met Anna hajare

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here