Home अहमदनगर शनिमंदीरातील दानपेटी व चांदीचे दागिणे चोरणार्‍या संगमनेरच्या आरोपीस अटक

शनिमंदीरातील दानपेटी व चांदीचे दागिणे चोरणार्‍या संगमनेरच्या आरोपीस अटक

Ahmednagar News accused of stealing donation boxes and silver jewelery arrested

अहमदनगर | Ahmednagar News: नगर येथील माळीवाडा येथील  शनीमंदिरातील दानपेटी व चांदीचे दागिने चोरणाऱ्या एकास कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रामदास विष्णू सावंत रा. जांबूत ता. संगमनेर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. नगर शहरातील रेल्वे स्टेशन येथे चीरीचे दागिने विकताना पोलिसानी त्यास ताब्यात घेतले आहे.

नगर शहरातील माळीवाडा येथील शनीमंदिरातील दानपेटी व चांदीचे दागिने चोरीला गेल्याची फिर्याद अनंत पांडे यांनी ९ जुलै रोजी रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात दिली होती. नगर रेल्वे स्टेशन परिसरात एक व्यक्ती चोरीचे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांना मिळाली. तेथे पथक पाठवून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली आहे. चोरी केलेले चांदीचे दागिने पोलिसानी हस्तगत केले आहे. निरीक्षक मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विवेक पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Ahmednagar News accused of stealing donation boxes and silver jewelery arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here