Home अहमदनगर सरपण गोळा करीत असताना मुलीपाठोपाठ आईचाही विहिरीत बुडून मृत्यू

सरपण गोळा करीत असताना मुलीपाठोपाठ आईचाही विहिरीत बुडून मृत्यू

Ahmednagar News mother drowned along with her daughter

कर्जत | Ahmednagar News: सरपण गोळा करीत असताना विहिरीत पडलेल्या मुलीला वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आईचा देखील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयदायक घटना घडली आहे.

आशा राजु उकिरडे (वय 42) व उमा राजू उकिरडे (वय 16) वर्ष या दोघींचा संदीप कानगुडे यांच्या विहिरीमध्ये बुडून दुर्देवी रित्या मृत्यू झाला आहे.

कर्जत तालुक्यातील कानगुडेवाडी येथील आशा व उमा या मायलेकी स्वयंपाक करण्यासाठी वाळलेले सरपण जाळण्यासाठी कानगुडे यांच्या शेतात गोळा करतात असताना त्यांच्या विहिरीजवळ वाळलेल्या लिंबाच्या झाडाची फांदी त्यांना दिसली. ही तोडण्याचा प्रयत्न करीत असताना उमा उकिरडे हिचा तोल जाऊन विहिरीत पडली. मुलीला वाचविण्यासाठी आई आशा यांनी देखील पाण्यामध्ये उडी घेतली. विहिरीत पाणीही भरपूर प्रमाणात होते. दोघींनाही पोहोता येत नसल्याने दोघींचाही मृत्यू झाला. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली गेली आहे.

Web Title: Ahmednagar News mother drowned along with her daughter

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here