Home अहमदनगर कोरोनाची तिसरी लाट येत असतानाचा अहमदनगरमध्ये नवे संकट

कोरोनाची तिसरी लाट येत असतानाचा अहमदनगरमध्ये नवे संकट

Ahmednagar News After Corona dengu disease started 

अहमदनगर | Ahmednagar News: कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असतानाच आता डेंगू तापाने डोके वर काढले आहे. नगर शहरात दोन रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातही काही तालुक्यांत डेंगूचे रुग्ण आढळून आले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पावसाळा सुरु असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच पुन्हा एकदा रुग्णवाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. पाउस होत असल्याने शहरात पाण्याची डबकी साचत आहे. डेंगूचा संसर्ग विषाणू बाधित दिस एजीप्ती डास चाव्यामुळे होतो. हा डास दिवसा चावणारा असून या तापाचा प्रसार मानवापासून डास व पुन्हा डासापासून मानव बाधित होतो. या डासांची उत्पत्ती घरातील व परिसरातील भांडी, टाक्या व टाकाऊ वस्तू साठलेल्या पाण्यातून होत असते.

नगर शहरात दोन रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग जागे झाले आहे. तसेच ज्या परिसरात रुग्ण आढळून आले आहेत. त्या परिसरात फवारणी करून सर्वेक्षण करण्यात आले आहे. आता डेंगूची साथ रोखणे आरोग्य विभागासमोर आव्हान उभे ठाकले आहे. नागरिकांनी कोणत्याही डबक्यात पाणी साचणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. 

Web Title: Ahmednagar News After Corona dengu disease started 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here