Home अहमदनगर माय लेकास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

माय लेकास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

Rahuri beaten and threatened with death Crime Filed

राहुरी | Crime: या रस्त्याने जायचे नाही हा रस्ता आमच्या मालकीचा असे म्हणत राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील माय लेकास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच दगडाने ठेचून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी सायंकाळी घडली.

याबाबत अभिजित बाबासाहेब सत्रे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यात म्हंटले आहे की, रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील सत्रे वस्ती परिसरात या घटनेतील आरोपी आले. ते अभिजित सत्रे यास म्हणाले कि, तुम्ही या रस्त्याने जायचे यायचे नाही. हा रस्ता आमच्या मालकीचा आहे असे म्हणत अभिजित सत्रे यास मारहाण करून ढकलून दिले. त्यावेळी त्याची आई भांडणं सोडविण्यासाठी आल्या असता त्यांच्याही डोक्यात दगड मारून मारहाण केली. परत आमच्या नादाला लागाल तर तुम्हाला दगडाने ठेचून मारून टाकू अशी जीवे मारण्याची धमकी दिली.

अभिजित सत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वांबोरी पोलीस ठाण्यात चंद्रकांत लक्षमण पात्रे, बाबासाहेब चंद्रकांत पटारे, अलकाबाई चंद्रकांत पटारे रा. वांबोरी यांच्यावर मारहाणीचा व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक दिनकर चव्हाण हे करीत आहे.

Web Title: Rahuri beaten and threatened with death Crime Filed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here