Home अहमदनगर पत्ते का खेळता अशी विचारणा केली असता तरुणावर प्राणघातक हल्ला

पत्ते का खेळता अशी विचारणा केली असता तरुणावर प्राणघातक हल्ला

Ahmednagar News Assault on a young man

अहमदनगर | Ahmednagar News: लॉकडाऊन सुरु असताना तुम्ही पत्ते का खेळता अशी विचारणा केली असता दोन जुगार खेळणाऱ्या तरुणाच्या डोक्यात दारूची बाटली मारून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना ३० जून रोजी केडगाव येथील बायजाबाई मंदिराच्या रोडवर रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात जखमी झालेल्या संकेत आठरे वय २६ रा. केडगाव याने दिलेल्या फिर्यादीवरून आकाश अशोक पवार व कार्तिक अशोक नरवडे रा. केडगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघे आरोपी हे पत्ते खेळत असताना आठरे यांनी त्यांना विचारणा केली असता पवार याने त्याला घट्ट पकडून ठेवले. व नरवडे याने त्याच्या डोक्यात बाटली मारली. यामध्ये आठरे हा जखमी झाला आहे.

Web Title: Ahmednagar News Assault on a young man

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here