Home अहमदनगर वाहन चालकास मारहाण करत रोख रक्कम व चार चाकी घेऊन पसार

वाहन चालकास मारहाण करत रोख रक्कम व चार चाकी घेऊन पसार

Ahmednagar News Beat the driver and pass with cash and four wheels

राहुरी | Ahmednagar News: बार्शी येथून राहुरी येथे भाडे घेऊन येत असताना चार चाकी वाहन चालकाला तीन भामट्यांनी मारहाण करत त्याच्या ताब्यातील सियाज कंपनीची चार चाकी व एक हजार रोख असा एकूण दहा लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी पसार केल्याची घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, राहुरी शहरातील व्यापारी संतोषकुमार लोढा यांचे व्याही अतुल राठोड हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी  येथील असून त्यांच्याकडे एमएच 13 बीएन 6355 क्रमांकाची सियाज कंपनीची चारचाकी कार आहे. त्या गाडीवर नवाब मोहम्मद पठाण रा. बार्शी हा चालक म्हणून काम करतो. दि. 26 जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान बार्शी बसस्थानक परिसरात तिघेजण राहुरीकडे येण्यासाठी वाहन शोधत होते. त्यावेळी त्यांनी तेथील एका रिक्षा चालकाला चौकशी केली. त्या रिक्षाचालकाने नवाब पठाण याला बोलावून घेतले.

राहुरी येथून एका महिला पेशंटला घेऊन यायचे, असे सांगत त्यांनी पठाण याच्या ताब्यातील सियाज गाडी भाडोत्री घेतली. सायंकाळी तेथून निघाल्यावर रात्री बारा वाजे दरम्यान ते राहुरी येथे आले. त्या भामट्यांनी चालकाला गाडी मल्हारवाडी  रोडकडे घेण्यास सांगितले. दरम्यान घोरपडवाडी येथील म्हसोबा मंदिर परिसरात गेल्यावर त्या तिघा भामट्यांनी पठाण या चालकाला मारहाण करून त्याला रूमाल व चार्जरच्या केबलने झाडाला बांधून ठेवले. त्याच्याजवळील एक हजार रुपये रोख व गाडी असा सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल घेऊन भामटे पसार झाले.

Web Title: Ahmednagar News Beat the driver and pass with cash and four wheels

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here