Home अहमदनगर पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आलेल्या एकाने महिलेसोबत केले असे काही

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आलेल्या एकाने महिलेसोबत केले असे काही

Crime News asking for an address did something to a woman

श्रीरामपूर | Crime News: श्रीरामपूर शहरात मोटारसायकलवर दोघे जण येत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावून चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे.  थत्ते ग्राऊंड परिसरातील उत्सव मंगल कार्यालयातील अपार्टमेंट समोर हा प्रकार घडला आहे. श्रीरामपूर पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अश्विनी वैभव गोडसे (वय 38) रा. उत्सव मंगल कार्यालयातील अपार्टमेंट यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, दिनांक २४ जून रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मी उत्सव मंगल कार्यालयातील अपार्टमेंट समोर उभी असताना एक अज्ञात इसम तेथे आला आणि त्याने पत्ता विचारल्याचा बहाणा केला आणि माझ्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने धक्का देत ओढून नेण्यात आले आणि गेटबाहेर उभ्या असलेल्या त्याच्या साथीदारासोबत मोटारसायकलवर बसून आरोपी पसार झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी अश्विनी गोडसे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सानप यांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. समाधान सुरवडे करीत आहेत.

Web Title: Crime News asking for an address did something to a woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here