Home Suicide News बायकोने दारू पिण्यास पैसे न दिल्याने पतीने कालव्यात उडी टाकून केली आत्महत्या

बायकोने दारू पिण्यास पैसे न दिल्याने पतीने कालव्यात उडी टाकून केली आत्महत्या

husband committed suicide by jumping into a canal 

श्रीरामपूर | Suicide: श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर सहा परिसरात खिल्लारी वस्ती येथे एका मजुरी करणाऱ्या इसमाने बायकोने दारू पिण्यास पैसे न दिल्याने कालव्यात उडी टाकून आत्महत्या केली आहे.

सागर रामदास कांबळे असे या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

तीन दिवसांपूर्वी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून दोघंमध्ये भांडण झाले. त्यानंतर पतीने थेट घराजवळील कालव्यात उडी मारली. त्यानंतर पतीने कालव्यात उडी घेतल्याची माहिती शहर पोलीस ठाण्यात दिली होती. अशोक नगर कारखान्यात समोरील पुलाजवळ पाठाच्या कालव्यात आज सकाळी १० वाजता त्याचा मृतदेह आढळून आला. कुजलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला.

अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय सानप, उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रघुनाथ खेडकर व संजय दुधाडे हे  करीत आहे.

Web Title: husband committed suicide by jumping into a canal 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here