Home महाराष्ट्र राज्यातील ह्या भागांत चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

राज्यातील ह्या भागांत चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra News Four days of torrential rains are expected

मुंबई | Maharashtra News: जून महिन्याच्या शेवटच्या चार दिवसांत मुंबईसह महारष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

जुलै महिन्यात पाउस पुन्हा दमदार हजेरी लावणार आहे.असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे ३० जून पर्यंत कोकण विभागात मध्यम स्वरूपाचा पाउस पडण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांत तुरळक स्वरूपात पाउस पडण्याची शक्यता आहे. हवेच्या चक्रीय स्थितीमुळे पूर्व मध्यप्रदेश व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. जुलै महिन्यात पाऊस राज्यात दमदार हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Web Title: Maharashtra News Four days of torrential rains are expected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here