Home क्राईम Crime News: संगमनेर शहरात २२ हजारांचा गुटखा जप्त

Crime News: संगमनेर शहरात २२ हजारांचा गुटखा जप्त

Crime news gutkas seized in Sangamner

संगमनेर | Crime News: राज्यामध्ये विक्रीस बंदी असताना संगमनेर शहरात गुटका विक्री सुरु आहे. शहरातील साईनगर गल्लीमध्ये विविध कंपन्यांचा गुटखा विक्री करणाऱ्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २२ हजार ८० रुपयांचा मुदेमाल जप्त केला आहे.

साईनगर गल्ली क्रमांक २ मादेह बेकायदेशीरपणे विविध कंपन्यांचा गुटखा विक्री सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला यामध्ये 13680 रुपये किंमतीचा पानमसाला पॅकेट 144 प्रत्येकी 120 रुपये किमतीचे, 3360 रुपयांचे रॉयल कंपनीची 717 तंबाखू 112 पॅकेट प्रत्येकी 30 रुपये किमतीचे, 2940 रुपये किमतीचे पान मसाला 7 पाकीट प्रत्येकी 420 रुपये किमतीचे, 2100 रुपयांचे तंबाखू 7 पॅकेट प्रत्येकी 300 रुपये किमतीचे असा एकूण 22 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन उगले यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून श्याम रामनाथ शेलकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कोकाटे हे करीत आहेत.

Web Title: Crime news gutkas seized in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here