हप्ता द्यावा लागेल अन्यथा सत्तूर डोक्यात घालीन, दुकानदारास मारहाण
अहमदनगर | Ahmednagar News: हप्ता द्यावा लागेल अन्यथा सत्तूर डोक्यात घालेन अशी धमकी देत दुकानदारास मारहाण झाल्याची घटना नगरमध्ये घडली आहे. बोल्हेगाव परिसरात ही घटना घडली आहे. याबाबत योगेश शिवाजी आव्हाड यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
विजय भगवान कुऱ्हाडे, असिफ कादिर पठाण, अमोल प्रदीप कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी दुपारी साडे चार ते सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान अमोल कदम व विजय कुऱ्हाडे हे आंबेडकर चौक बोल्हेगाव येथे फिर्यादीच्या चिकन मटन माशांच्या दुकानात आले. दुकानातील कामगार नवाज शेख व अन्सार शेख यांना दररोज ५०० रुपयांचा हप्ता द्या अन्यथा हप्ता दिला नाही तर सत्तूर डोक्यात घालीन अशी धमकी देऊन दमदाटी व शिवीगाळ केली.
त्याचबरोबर ५० रुपये त्यांच्याकडून काढून घेतले. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आरोपी तेथे गर्दीत उभा असलेला असिफ कादिर पठान व आरोपी कुर्हाडे यांनी फिर्यादी आव्हाड यांच्यावर कोयत्याने वार केला तसेच आरोपींनी आव्हाड यांना लाथाबुक्क्यांनी मार्हना करत शिवीगाळ करून आरोपी अमोल कदम याने खिशातील ७०० रुपये काढून घेतले त्यानंतर आरोपी तेथून पळून जाऊ लागले.
Web Title: Ahmednagar News Beating the shopkeeper