तळ्यात अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ
श्रीरामपूर | Ahmednagar News: श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी येथे एका तळ्यात अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याने याप्रकरणी मुलीच्या वडिलानी घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. उशिराने हा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
निमगाव खैरी येथील तळ्यात काल दुपारी 11 वाजेच्या सुमारासएक मृतदेह आढळून आला.सदर मृतदेह हा कुजलेला अवस्थेत होता त्यामुळे हा मृतदेह कोणाचा हे कोणालाच सांगता येत नव्हते.. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर हा मृतदेह स्त्री जातीचे असल्याचे निष्पन्न झाले.
नवीन फिचर असलेले पोर्टल वापरण्यासाठी आजच अप अपडेट करा येथे: संगमनेर अकोले न्यूज
सदर मुलगी ही गावातीलच असल्याची ओळख पटली. ती 3 ऑक्टोबरपासून बेपत्ता झाली होती, असे सांगण्यात आले. तसेच तिच्या कानातील रिंगमुळे तिच्या वडिलांनी तिला ओखळले. या तळ्याजवळ एका पुरुषाचा गॉगल आढळून आला आहे. तसेच तिचे सौंदर्य प्रसाधनाचे साहित्य जळालेल्या अवस्थेत आढळून आले आहे. त्यामुळे तिच्या वडिलांनी माझ्या मुलीचा घातपात झाला असून तिला मारुन टाकण्यात आले असल्याचे सांगितले. सदरचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर येथे पाठविण्यात आला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Web Title: Ahmednagar News body of a minor girl being found in a pond