Home अहमदनगर बंदी असतानादेखील या तालुक्यात बैलगाडा शर्यत, तहसीलदारांना माहिती मिळताच

बंदी असतानादेखील या तालुक्यात बैलगाडा शर्यत, तहसीलदारांना माहिती मिळताच

Ahmednagar News Bullock Cart Race in Parner 

अहमदनगर | Ahmednagar News: जिल्ह्यात बैलगाडा शर्यत आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सर्वत्र जत्रा यात्रेस बंदी घालण्यात आली आहे. असे असून सुद्धा पारनेर तालुक्यातील शिरापूर गावात बैलगाडा शर्यत भरविण्यात आली होती.

याबाबत माहिती मिळताच पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे पोलिस पथकासह गावात दाखल झाल्या. मात्र, पथक पोहोचेपर्यंत शर्यती संपवून सर्वजण निघून गेले. गावातही कोणी भेटले नाही. मात्र, यासंबंधी मिळालेला व्हिडिओ आणि ग्रामपंचायतीत आढळून आलेल्या रजिस्टरच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अगोदरच पारनेर तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे २२ गावांत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यातच तालुक्यातील शिरापूर गावात बैलगाडा शर्यत सुरु असल्याची माहिती तहसीलदार यांना मिळाली. त्या घटनास्थळी दाखल झाल्या मात्र त्या गावात पोहोचेपर्यंत शर्यती संपवून सर्वजण पळून गेले होते. घटनास्थळी शर्यत भरविल्याच्या खुणा, भंडारा उधळेला आढळून आला. त्यावरून शर्यती होऊन गेलेल्या माहितीला पुष्टी मिळाली.

तेथे एक रजिस्टर आढळून आले. त्यामध्ये शर्यतीत भाग घेतलेल्या लोकांची नावे,  हिशोब असा मजकूर होता. याशिवाय त्या शिपायाच्या मोबाईलमध्ये शर्यतीचे व्हिडिओ आणि फोटो होते. ते सर्व ताब्यात घेण्यात आले. त्या आधारे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

Web Title: Ahmednagar News Bullock Cart Race in Parner 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here