Home अहमदनगर नगर जिल्ह्याचा निकाल इतके टक्के

नगर जिल्ह्याचा निकाल इतके टक्के

Ahmednagar News SSC Result 2021

अहमदनगर | Ahmednagar News SSC Result 2021: महाराष्ट्र राज्य माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता १० वी चा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. नगर जिल्ह्याचा निकाल ९९.९७ टक्के निकाल लागला आहे.

कोरोनामुळे यंदा परीक्षा रद्द झाल्याने राज्यशासनच्या निकषानुसार गुण देण्यात आले. त्यामुळे एकही दिवस वर्ग न भरता व परीक्षा न देता हा पहिलाच निकाल लागला आहे. नगर जिल्ह्यातून मार्च २०२१ या वर्षात परीक्षेसाठी ७० हजार ५८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्यात आला. अंतर्गत मूल्यमापन नुसार विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यांपैकी ७० हजार ५८५ विद्यार्थ्यांचे मुल्यांकन प्राप्त झाले. यामध्ये ७० हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. १९ विद्यार्थी अनुउत्तीर्ण झाल्याचे दिसून येथे गेल्या वर्षी नगर जिल्ह्याचा निकाल ९६.१० टक्के लागला होता.

Web Title: Ahmednagar News SSC Result 2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here