Home अहमदनगर जिल्ह्यात खोदकामात गुप्त धन मिळाल्याचा दावा

जिल्ह्यात खोदकामात गुप्त धन मिळाल्याचा दावा

Ahmednagar News Claims to have found secret money in excavations

श्रीरामपूर | Ahmednagar News: तालुक्यातील बेलापूर येथील एका व्यक्तीने घराच्या आवारात खोदकाम करताना गुप्त धन सापडल्याचा दावा केला आहे. या व्यक्तीने जिल्हाधिकारी यांच्याकडे रीतसर अर्ज करत पंचनामा करण्याची विनंती केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून बुधवारी तहसीलदार प्रशांत पाटील हे गुप्त धनाचा पंचनामा करणार आहे. बेलापूर येथील एका व्यक्तीला आपल्या पूर्वजांनी गुप्त धन ठेवल्याची खात्री होती. त्यानुसार त्याने घराच्या आवारात अनेकदा मजुरांकडून खोदकाम करून घेतले. अनेकवेळा प्रयत्न केल्यानंतर १० ते १५ दिवसांपूर्वी हे गुप्त धन प्रत्यक्षात सापडले आहे. त्यानंतर त्या व्यक्तीने जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे. त्यात पंचनामा करण्याची विनंती त्यांनी केली आहे.

तहसीलदार प्रशांत पाटील यांना याबाबत विचारले असता सदर व्यक्तीचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाल्याने वरिष्ठांकडून आदेश मिळाले आहेत. बुधवारी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बुधवारी सरकारी अधिकाऱ्यांनी पंचनामा केल्यानंतरच हे गुप्त धन किती व कोणत्या स्वरूपातील आहे हे स्पष्ट होणार आहे.

Web Title: Ahmednagar News Claims to have found secret money in excavations

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here