Home अहमदनगर Crime News: सरपंचाचे पतीने हमालास केली मारहाण

Crime News: सरपंचाचे पतीने हमालास केली मारहाण

Crime News Sarpanch's husband beats Hamalas

जामखेड | Crime News: खर्डा गावाचे सरपंचाचे पती यांनी उसने पैसे आत्ताच पाहिजे असे म्हणत हमालाची गचांडी धरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजता घडली. जामखेड पोलीस ठाण्यात सरपंच पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद अंकुश गीते  ने जामखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, तालुक्यातील आनंदवाडी येथील शरद अंकुश गीते  हा हमाली करीत आहे. शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजता शरद गीते हा आनंदवाडी वरून खर्डा गावाकडे मोटारसायकलवरून येत असताना इंग्लिश स्कूल शाळेकडे खर्डा गावाचे सरपंच पती आसाराम गोपाळघरे यांनी गीते यांची मोटारसायकल अडविली. माझे उसने दिलेले पैसे मला आत्ताच पाहिजे असे म्हणून गीते यांची गचांडी धरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तेसेच शिवीगाळ व दमदाटी केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी  आसाराम गोपाळघरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: Crime News Sarpanch’s husband beats Hamalas

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here